lara dutta 
मनोरंजन

सलमानची फेवरेट अभिनेत्री कोण आहे पाहा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः बाॅलीवूडचा मस्तमौला अभिनेता म्हणजे सलमान खान. आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत अनेक चढउतार आले आणि प्रत्येक गोष्टींचा त्याने सामना केला. नेहमीच तो कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत राहिला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने अनेकांना मदत केलीआहे. कित्येकांच्या डोक्यावर त्याने हात ठेवला आहे आणि त्याचं सोनं झालं आहे. कित्येक नवोदितांना त्याने संधीदिली आहे. कित्येक गायकांना त्याने मदत केली आहे आणि त्यांना ब्रेक देण्याचे कामही केले आहे. त्याच्या या उदारपणाच्या चर्चा हिंदी चित्रपटसृष्टी नेहमीच चवीने चर्चिल्या जातात. तसा त्याचा स्वभाव तडक-भडक आहे खरा. पण तितकाच तो प्रेमळ आणि मनमिळावू आहे. त्याची एखाद्याशी मैत्री झाली की त्याला तो नक्कीच मदत करतो. त्याच्या मदतीसाठी तो धावून जातो. कधी कुणावर तो रागावेल आणि कधी कुणावर अधिकप्रेम करील हे सांगता येत नाही. सध्या तो लाॅकडाऊनमध्ये आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर आहे. तेथे तो जीम वगैरे करीत आहे. नुकतेच त्याने एक गाणे सोशल मीडियावर लाँच केले.

आता त्याने असाच मदतीचा हात दिला आहे अभिनेत्री लारा दत्ता हिला. अभिनेत्री लारा दत्ताच्या `हंड्रेड` नावाची वेबसीरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. हाॅटस्टारवर ही वेबसीरीज येणार आहे. परंतु सध्या या ट्रेलरचीच चर्चा रंगलेली आहे. या वेबसीरीजमध्ये लारा दत्ता सौम्या शुक्ला नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारीत आहे. तिने या वेबसीरीजचा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि मग सलमानने तिला मदत करण्याचे ठरविले. 

सलमानने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करीत एक कॅप्शन लिहिली त्यात त्याने म्हटले, की मेरीफिल्म पार्टनर और मेरी फेवरेट अॅक्ट्रेस लारा, इनकी फिल्म जरूर देखे...आता या ट्रेलरला चांगली पसंती मिळाली आहेच. पण त्याचबरोबर आता ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे आणि हाॅटस्टारवर प्रेक्षकांना तीपाहता येईल. विशेष म्हणजे लारासारख्या बड्या अभिनेत्रीबरोबर `सैराट` फेम रिंकू राजगुरुलाही काम करण्याची संधी मिळाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT